मंथन

राष्ट्रिय व आंतरराष्ट्रीय पातळीवर लौकिक संपादित केलेले यशवंत व गुणवंत विद्यार्थी घडविणारया अनेक तांत्रिक संस्था मुंबईत आहेत. संशोधनाच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणारी एक संस्थ म्हणजे इंस्टीटयुट आफॅ केमिकल टेक्नोलॅाजी (आय.सी.टी). आय.सी.टी. हि ब्रिटिशकालीन वास्तु हिरवळीने नटल्याने व सजल्याने तिला आल्हाददायक व शांत वातावरणाची छान सात लाभते. आय.सी.टी. या संस्थेत औषधेनिर्माणशास्त्र , रसायन तंत्रज्ञान या क्षेत्रातील नानाप्रकारच्या संशोधनाचे काम होते. विद्यार्थ्यांचा विविध कलागुणांना वाव देण्यासाठी आपल्या संस्थेत सध्या विविध उपक्रम कार्यरत आहेत.मंथन हे त्यातीलच एक. मनोरंजनातून प्रभोधन या हेतूने १९८३ मध्ये उपक्रम सुरू करण्यात आला. १९८३ मध्ये त्यावेळचे आपल्या संस्थेचे संचालक प्रा. डी. व्ही. रेगे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी दशेत असलेल्या प्रा. सुनिल भागवत , प्रा. आनंद पटवर्धन व श्री. विजय हब्बू यांच्या पुढाकाराने मंथन या मराठी वैचारिक संगीत व साहित्य मंडलाची सुरूवत झाली. मंथनच्या व्यासपीठावर आजपर्यंत वैविध्यपूर्ण कार्यक्रमंाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सुधीर फडके, वसंत बापट, दाजी भटवडेकर, गिरीजा कीर यांच्यासारख्या संगीत आणि सहित्य क्षेत्रातील विविध मान्यवरांचे कार्यक्रम झाले. मंथनच्या माध्यमातूनच अच्युत गोडबोले, द्वारकानथ संझगिरी, अरविंद गोखले, अरविंद इनामदार यांच्यासारख्या विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींशी विद्यार्थ्यांनी संवाद साधला.

यंदा मंथन सादर करत आहे,

  • क..कवितेचा
  • मुलूख गिरी
  • बेधुंद सुरांच्या लहरी
  • हास्यकल्लोळ
  • चर्चा
  • सोबत नव्या पर्वाची नवी सुरवात
  • नृत्यनाट्य व कला क्षेत्राबरोबरच सामाजिक बांधिलकी जपणारे आणि खुलवणारे कार्यक्रम ह्यावर्षी सादर करणार आहोत.